प्रतिष्ठा न्यूज

कृषी सहाय्यक खाजगी सावकार औताडे याला बडतर्फ करा अमोल काळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून खाजगी सावकारी करणाऱ्या कृषी सहाय्यक दत्तात्रय अवताडे याला सेवेतून तात्काळ निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला आहे यासंबंधी जिल्हा कृषी अधिकारी यांना आज निवेदन दिले.कृषी सहाय्यक दत्तात्रय औताडे याच्यावर कारवाई बाबतचे निवेदन यापूर्वी देण्यात आले होते.त्यानंतर शनिवार २९ जुलै रोजी खाजगी सावकार औताडे याला तासगाव पोलीसांनी अटक केली आहे.संबंधित खाजगी सावकार औताडे हा तासगाव पूर्व भागात मोठया प्रमाणात खाजगी सावकारी करत आहे.खाजगी सावकारी करण्यासाठीचा पैसा हा कृषी विभागातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून त्याने जमवला आहे.जवळ जवळ दहा कोटींच्या आसपास व्याजाने पैसे दिले आहेत.याच पैशाच्या जोरावर काही गाव गुंडांच्या जीवावर सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना धमकी देऊन व्याजाचे पैसे वसुल करत आहे.
तरी या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देवून या घमंडी कृषी सहाय्यक सावकाराला तातडीने बडतर्फ करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.