प्रतिष्ठा न्यूज

अवयव दान व देहदान ही काळाची गरज : ज्योती आदाटे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा आयोजित महाआरोग्य शिबीर शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि 29 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 4 वा पर्यंत होणार असुन या महाआरोग्य शिबीरात महिला आघाडीच्या प्रदेश सचिव ज्योती आदाटे आणि सांगली शहर जिल्हाच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे यांच्या संकल्पनेतून अवयव दान व देहदान हा उपक्रम होणार आहे.या उपक्रमात सर्वोपचार रुग्णालय सहभागी व्हावे यासाठी मा अधिष्ठाता डॉ एस बी ननंदकर आणि उपवैधकिय अधिक्षक डाॅ रुपेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ज्योती ताई म्हणाल्या की सर्वोपचार रुग्णालय सांगली ची टीम आपल्या या देहदान व अवयव दान उपक्रमात सहभागी होणार असून जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान व देहदान चा फाॅर्म भरुन आपण आपली सामाजिक बांधिलकी जपावी याचा एकच उद्देश आपण आपल्या पश्चात सुद्धा अनेकजणांना जीवदान देऊ शकतो त्यासाठी सर्वांनी यावे आणि या महत्वपूर्ण कार्याला हातभार लावला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.