प्रतिष्ठा न्यूज

अन्यथा बेदाणा सौदा बंद पाडणार.. सुरेश पाटील यांच्या आशिर्वादानेच शेतकऱ्यांची लूट काँग्रेसचें महादेव पाटील यांचा घणाघात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव मार्केट कमिटी निवडणुकीत राष्ट्रवादीचें रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांनी बेदाणा शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवन्यासाठी प्रयत्न करू तसेच नवीन मार्केट यार्ड एक वर्षात सुरु करण्याचे आश्वासन दिले होते याचा त्यांना विसर पडला असून,बेदाणा उधळण करून व्यापाऱ्यांकडून होणारी कोट्यावधी रुपयांची लूट ही सुरेश पाटील आणि मार्केट कमिटीचें सत्ताधारी संचालक यांच्या आशिर्वादानेच होत असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अन्यथा बेदाणे सौदे बंद पाडण्याचा इशारा काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक महादेव नाना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.याबाबतचें निवेदन त्यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना दिले आहे.त्यात त्यानी म्हंटले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावं मध्ये सोमवार,गुरूवार,व शनिवारी बेदाणा सौदे असतात तसेच सांगली येथे बुधवार व शुक्रवार सौदे असतात तसेच पंढरपूर येथे मंगळवार व शनिवार बेदाणा सौदे असतात.सौदे काढतेवेळी सॅम्पलच्या नावाखाली प्रत्येक वेळी ५ किलो पर्यंत बेदाणा उधळला जातो यामुळे शेतकऱ्याचे खुप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच न विक्री झालेल्या बेदाण्याची तुट ही प्रत्यक्ष विक्री झालेनंतर धरली जाते.हा शेतकऱ्याच्या वरती खुप मोठा अन्याय आहे.वास्तविक कोणत्याही प्रकारचा शेती माल विकताना शेतकऱ्यावरती आर्थिक बोजा टाकणे हे न्यायसुसंगत नाही महाराष्ट्र शासनाने शेती माल विक्री व्यवस्थेबाबत दांगट समीती नेमली होती या समितीने शासनास सादर केलेल्या अहवालात बेदाणा हवेत उधळून नुकसान करणे उधळलेला बेदाणा शेतकऱ्याना परत न करणे या बाबतच्या बाजारसमितीत चालणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याची शिफारस केली आहे.तरी तासगांव,सांगली व पंढरपूर या ठिकाणी निघणाऱ्या बेदाणा सौदयामध्ये दांगट समितीच्या अहवालाची अमंलबजावणी करून उधळलेल्या बेदाण्याची तूट धरण्याची अनिष्ठ प्रथा बंद करावी यासाठी संबंधित बाजार समित्याना आपले मार्फत आदेश दयावेत अन्यथा आपल्या कार्यालयाच्या समोर न्यायमार्गाने आंदोलने करण्यात येईल.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.