प्रतिष्ठा न्यूज

सुधीर गाडगीळ यांनी चार वर्षांत सांगलीसाठी आणला २ हजार ६५० कोटींचा निधी : पत्रकार परिषदेत दिली माहिती; सांगलीचा चेहरा मोहरा बदलणार; सांगली पेठ रस्त्याचे काम जानेवारीत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चार वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी २ हजार ६५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील बहुसंख्य कामे पूर्ण झाली असून प्रलंबित कामे दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर सांगलीचा चेहरा मोहरा बदलेला दिसेल. सांगली-पेठ रस्त्याच्या कामाची निविदा निश्चित झाली आहे. या महामार्गासाठी ८६० कोटींचा निधी मंजूर आहे. या रस्त्याचे काम जानेवारीत सुरू होईल, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सुधीर गाडगीळ म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला सलग दुसऱ्यांदा मिळाली. विरोधक माझ्यावर कितीही आरोप करत असले तरी विरोधकांच्या आरोपांना मी कामांमधूनच प्रत्युत्तर देत असतो. राजकारणात आरोप- प्रत्यारोप होत असतात. मी कधीही आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही. यापुढेही देणार नाही. ज्या मतदारांनी मला संधी दिली, त्यांच्यासाठी अव्याहतपणे काम करत राहणार आहे. चार वर्षात आरोग्य विषयक बाबींसाठी ३७० कोटींचा निधी मंजूर झाला. आमदार निधीतून २०१९ मध्ये २.८५ कोटी, २०२०-२१ मध्ये ३.६ कोटी, २०२१-२२ मध्ये ४.१८ कोटी, २०२२-२३ मध्ये ४.६३ कोटी, २०२३-२४ मध्ये ४.२९ कोटींची कामे झाली. रस्ते डांबरीकरण, गटार बांधकाम, सामाजिक सभागृह, गुंठेवारी विकास तसेच पथदिव्यांची कामे केली. जनसुविधा योजनेतून ४.७५ कोटी, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून १.३५ कोटी, ग्रामीण विकास योजनेतून ११ कोटी, डीपीसीतून (जिल्हा नियोजन समिती) ८ कोटी, अर्थसंकल्पीय तरतुदीतून १९१ कोटी, नाबार्ड योजनेतून १४.१८ कोटी,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २३.६६ कोटी,
विविध विकास कामांमधून १३५ कोटी रुपये मंजूर करून कामे मार्गी लावली आहेत.
कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी २५३ कोटी, हनुमानगर येथे अत्याधुनिक नाट्यगृहासाठी २५ कोटींचा निधी मंजूर आहे. त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारले. महापालिका क्षेत्राच्या विकास कामांसाठी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हायब्रीड न्युईटी (हॅम) अंतर्गत कुमठे फाटा ते सांगली रोडसाठी १५० कोटी, जुनी धामणी इनामधामणी ते कुपवाड फाटा लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रोडसाठी २३३ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे.
हॉटेल पॅराडाईज येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे उपस्थित होते.

आमदार सुधीर गाडगीळ निवेदन सम्राट नव्हे कार्यसम्राटच : शेखर इनामदार
आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर निवेदन सम्राट असा आरोप केला जातो. मात्र निवेदन दिल्याशिवाय कामे होणार कशी? कोणतेही काम करायचे झाले, तर त्यासाठी पत्र, निवेदन द्यावेच लागते. तोंडी सांगून कामे होत नाहीत. आमदार गाडगीळ यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चांगला विकास होत आहे. विरोधक केवळ आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आमदार सुधीर गाडगीळ हे निवेदन सम्राट नसून कार्यसम्राटच आहेत, असे मत भाजपचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेखर इनामदार यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.