प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथे शासनाच्या “विकास संकल्प रथ यात्रेचा रथ माघारी- आरक्षण प्रश्नी गावबंदी…

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील उमरा येथे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी गावबंदी असल्यामुळे शासनाच्या “विकास संकल्प रथ यात्रा” माघारी पाठविण्यात आली आहे.
जो पर्यंत राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पूर्ण निकाली लागत नाही तो पर्यंत शासनाच्या कोणत्याही विकास योजने बाबत जनजागृती वर आधारित कार्यक्रमास गावबंदी करण्यात आली असून हा “विकास संकल्प रथ यात्रा” गावात आणून फिरवू नये असे सांगण्यात आले असून तशा प्रकारचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर उपसरपंच- स्वप्नील पाटील उमरेकर, डॉ. राजेश सिरसाट, सचिन सिरसाट, एन. डी. सिरसाट, दाजीराव सिरसाट, मनोहर सिरसाट,
वसंत सिरसाट, दत्तात्रय जाधव, जीवराज सिरसाट
शशिकांत सिरसाट, स्वप्नील सिरसाट, दादाराव कदम
मारोती वडजे, गुणवंत सिरसाट आदींच्या सह्या आहेत. एकंदरीत उमरा सर्कल मधीन अनेक गावांत या विकास संकल्प रथ यात्रेला विरोध होत असल्याचे समजते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.