प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

उमरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा- शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथे दि.9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा, शिवलिला अमृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उमरा परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक-कथा प्रवक्त्या भागवताचार्या हभप- सुनिताताई वडजे पाटील यांनी केले आहे.
या सप्ताहात खालील महाराजांची सेवा लाभणार आहे हभप- प्रभाकर महाराज पुयड मिश्री पिंपळगांवकर,  हभप- गोरक्षक ज्ञानेश्वर महाराज काकांडीकर, हभप- त्र्यंबक आगा नंदगांवकर, हभप- रोहण महाराज उमरेकर (बाल किर्तनकार), हभप- जानकीराम महाराज कंधारकर, हभप- युवराज महाराज
खैरनार (धुळे), हभप- जगदिश महाराज सोनवणे, परळी, व हभप- माधव महाराज लिमलेकर
(लातूर), यांचे काल्याचे किर्तन दि.16 फेब्रुवारी रोजी वेळ: सकाळी 10 ते 01 या वेळात होणार आहे.  सप्ताह स्थळ : हभप सुनिताताई सदाशिवराव वडजे यांचे शेतातील- स्वयंभू महाकालेश्वर मंदिर, उमरा.
या सप्ताहातील विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शक म्हणून- हभप- एम.डी.सिरसाट (गुरूजी) हे राहणार आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.