प्रतिष्ठा न्यूज

शक्तिपीठ महामार्गाविरोधात गावोगावी उद्या प्रतिकात्मक आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहीजे या मागणीसाठी उद्या दि. ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. म्हणुन उद्या ८ रोजी गावोगावी प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
२३ मार्च रोजी शक्तिपीठमहामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सांगलवाडीत मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. या धरणे आंदोलनासाठी प्रशासनाने ३७(१)३ कलनान्वये परवानगी नाकारली. परवानगी नाकारली असली तरी सुद्धा गावोगावी प्रकिकात्मक आंदोलन करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. बैठकीस उमेश देशमुख, सतिश साखळकर, महेश खराडे, उदय पाटील, यशवंत हारुगडे, प्रभाकर तोडकर, सुनिल पवार
घनश्याम नलावडे, भूषण गुरव पैलवान विष्णू पाटील,उमेश येडके
विलास थोरात रघुनाथ पाटील सुधाकर पाटील इ. उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.