प्रतिष्ठा न्यूज

२१लाख ८१ हजार १२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, पान मसाला व गुटखा जप्त ; एक आरोपी जेरबंद : सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, सांगली यांची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, पान मसाला व गुटखा असा २१लाख ८१ हजार १२०/- रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी १) सलीम मुजावर वय-३५ वर्षे रा.१०० फुटीरोड विनायकनगर सांगली ता मिरज जि सांगली यास आरोपी जेरबंद केले आहे. तर इरशाद मुलाणी रा खॉजा कॉलनी सांगली ता मिरज जि सांगली हा फरारी झाला आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.

*गुन्ह्याची थोडक्यात हकिकत*
मा.श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, साो, सांगली., श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगली श्री. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली. यांनी अवैद्य धंदयांवर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापुर रोडवरील अंकली फाटा येथे अंतरजिल्हा चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी हजर असणारे पोना/ रमेश पाटील व इतर पोलीस स्टाफ यांना दिं.०६.०४.२०२४ रोजी १५.३० वा. चे सुमारास मिरजेकडुन सांगलीकडे येणारा एक पांढरे रंगाचे अशोक लेलैंड दोस्त गाडी नंबर एम.एच. ५०-७४२९ हा भरधाव वेगाने येत असताना दिसला त्यामुळे सदर गाडीचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पूडून जाण्याचा प्रयत्न करताना सदर ठिकाणी हजर असणारे पोलीस अंमलदार पोना/रमेश पाटील, पोशि/असिफ नदाफ व पोशि / सतिश सातपूते यांनी अत्यंत शिताफितीने सदर वाहणास अडवून वाहन ताब्यात घेवून चालकासा त्याचे नांव गांव विचारता त्याचे नांव १) अस्लम सलीम मुजावर वय-३५ वर्षे धंदा-ड्रायव्हर रा.१०० फुटीरोड विनायकनगर सांगली ता मिरज जि सांगली व मालक २) इरशाद मुलाणी रा खॉजा कॉलनी सांगली ता मिरज जि सांगली. असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर सदर वाहनातील माल चेक केला असता त्यांना वरील प्रमाणे जप्त २१,८१,९२०/- रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू, पान मसाला व गुटखा मिळून आला. सदरचा मुद्देमाल पोउपनि/नितीन बाबर यांनी दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केला. त्यानंतर सदर आरोपींवर भादविस कलम १८८,३२८,३४ व अन्न सुरक्षा आणि मानके अधि-२००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं.१ सलीम मुजावर वय-३५ वर्षे रा.१०० फुटीरोड विनायकनगर सांगली ता मिरज जि सांगली. यास अटक करुन त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दि.१०.०४.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि / नितीन बाबर या करीत आहेत.

*जप्त मुद्देमाल*
१) ९६,८००/- एकुण ४ खाकी रंगाचे पोती त्यापैकी प्रत्येक पोत्यात ०५ पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये १० छोटया पांढ-या रंगाच्या पिशव्या, त्यामध्ये प्रत्येक छोट्या पिशवीत २२ पुड्या असून त्यावर V-1 TOBACCO HAPPY HOLI तंबाखु व कन्नड भाषेत अक्षरे असलेली व पाठीमागील बाजुस एमआरपी २२ रुपये असे असून एकुण ४४०० पुडया आहेत.

२) ८,७१,२००/- एकुण २० खाकी रंगाचे पोती त्यापैकी प्रत्येक पोत्यामध्ये १० पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यामधील प्रत्येक पिशवीत २२ पुड्या असून त्यावर केसर-युक्त विमल पान मसाला असे मराठी अक्षरे असून पाठीमागील बाजुस एमआरपी १९८ रुपये असे एकुण ४४०० पुडया आहेत.

३) १,४४,०००/- एकुण ०३ खाकी रंगाचे बॉक्स त्यापैकी प्रत्येक बॉक्समध्ये ८० छोटे बॉक्स असून त्यामध्ये आरएमडी सुगंधी तंबाखु असे इंग्रजीत भाषेत लिहलेले असून पाठीमागील बाजुस एमआरपी ६०० रुपये असे लिहिलेले एकुण २४० छोटे बॉक्स असल्याचे दिसत आहेत.

४) २,१६,०००/- एकुण ०६ खाकी रंगाचे बॉक्स त्यापैकी प्रत्येक बॉकसमध्ये ४० छोटे बॉक्स आरएमडी पान मसाला असे इंग्रजीत भाषेत अक्षरे लिहलेले असून पाठीमागील बाजुस एमआरपी ९०० रुपये असुन असे एकुण २४० छोटे बॉक्स असल्याचे दिसत आहेत.

५) ७७,७९२/- एकुण ०२ खाकी रंगाचे पोते त्यामध्ये प्रत्येक पोत्यात ०४ पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुड्या असून त्यावर केसर युक्त विमल पान मसाला पाठीमागील बाजुस एमआरपी १८७ रुपये असे असून एकुण ४१६ पुड्या आहेत.

६) १२,४८०/- एकुण ०२ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकचे पोते प्रत्येक पोत्यात ०४ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुडया असून त्यावर केस युक्त V-1 TOBACCO पाठीमागील बाजुस एमआरपी ३० रुपये असे असून एकुण ४१६ पुडया आहेत.

७) ४९,९२०/- एकुण ०२ खाकी रंगाचे पोते त्यामध्ये प्रत्येक पोत्यात ०४ पांढरे रंगाचे प्लॉस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुड्या असून त्यावर केस युक्त विमल पान मसाला पाठीमागील बाजुस एमआरपी १२० रुपये असे असून एकुण ४१६ पुड्या आहेत.

८) १३,७२८/- एकुण ०२ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकचे पोते प्रत्येक पोत्यात ०४ पांढरे रंगाचे प्लॅस्टीकच्या पिशव्या त्यापैकी प्रत्येकी पिशवीमध्ये ५२ पुड्या असून त्यावर केसर युक्त V-1 TOBACCO पाठीमागील बाजुस एमआरपी ३३ रुपये असे असून एकुण ४१६ पुड्या आहेत.

९) ७,००,०००/- एक पांढरे रंगाची अशोक लेलँड दोस्त चारचाकी गाडी त्याचा आरटीओ नंबर एम.एच. ५०-७४२९ असा नंबर अलेली कि.अ.
एकुण २१,८१,९२०/- रुपये,

*कारवाई करणारे पोलीस अधिकारी व पोलीस :* अमंलदार श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगली
श्री. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, श्रीमती प्रियंका बाबर, श्री. नितीन बाबर, परी. पोउपनि, श्री. इस्माईल तांबोळी मोदी, पोहेकॉ महेश जाधव, पोना/ रमेश पाटील, पोकॉ/हिम्मत शेख व पोलीस मुख्यालय कडील पोकॉ१८०३, असिफ नदाफ, पोकॉ/२१५ सतिश सातपूते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.