प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यात कोंबिग व ऑल आउट ऑपरेशनमध्ये सापडले ६० हुन अधिक आरोपी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात कोंबिग व ऑल आउट ऑपरेशनमध्ये विविध गुन्ह्यात हवे असलेले, फरारी तसेच शब्द पार केलेले असे सुमारे ६० हुन अधिक आरोपी सापडले आहेत.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेशान्वये सांगली जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. ११/०७/२०२४ रोजी रात्रौ २३.०० वा ते दि. १२/०७/२०२४ रोजीचे रात्रौ ०३.०० वा चे दरम्यान नाकाबंदी, कोम्बीग व ऑल आऊट ऑपरेशन चे आयोजन करण्यात आले होते.

सदर ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान आर्म अॅक्ट, पाहिजे व फरारी आरोपी अजामीनपात्र वॉरट, तडीपार आरोपीवर कारवाई, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली. सदर ऑल आऊट ऑपरेशन मध्ये सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखाचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्यात आली. सदर नाकाबंदी, कोम्बीग व ऑल आऊट ऑपरेशन करीता ४२ पोलीस अधिकारी, २१९ पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती.

सदर नाकाबंदी, कोम्बीग व ऑल आऊट ऑपरेशनमध्ये ०८ पाहिजे आरोपी, ०८ फरारी आरोपी, ४४ अजामीनपात्र वॉरटमधील आरोपी, ४ अवैध धंदयावर कारवाई करण्यात आली असून ८६ रेकॉडवरील आरोपी चेक केले आहेत. २ तडीपार इसमांवर मपोका १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली. ऑल आऊट मध्ये आयोजित केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदयान्वये १५१ कारवाई करण्यात आल्या असून त्यात संबधित वाहनावर १,३९,५५०/- रुपये दंड करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.