प्रतिष्ठा न्यूज

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार

प्रतिष्ठा न्यूज
जत : विजयपूर- पंढरपूर या राज्य मार्गावर उमदी पासून चार कि.मी. अंतरावर सोरडी फाट्याजवळ शेवाळे वस्ती लगत दोन मोटरसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात भीमराव मायाप्पा पडवळे (वय 45, रा. शिवणगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर) व उटगी ता. जत येथील इराप्पा तम्माराया बिराजदार वय 21 असे दोघे जण मयत झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोटगी येथील तरुण बिराजदार हा गंभीर जखमी झाल्याने इराप्पा बिराजदार याचे सांगलीला पुढे उपचारांसाठी नेत असताना वाटे जवळ कवठेमहांकाळ हद्दीतच मयत झाल्याने त्यास पुन्हा जत येथे आणण्यात आले. दोन्ही मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आले.
मयत भीमराव हे व्यवसायाने शेतकरी होते तर उमदी येथे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलीला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन येत होते. तर मयत इराप्पा हा व्यवसायाने ट्रॅक्टर ड्रायव्हर होता तो आपला मालक मुकादम यांच्यासोबत शिवणगी कडुन चिखलगीकडे निघाले होता सोरडी फाट्याजवळ जवळ शेवाळे वस्तीलगत दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन गंभीर अपघातात भीमराव हे जागीच ठार झाले. तर इराप्पा याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाला होता. त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास मिरज येथे हलविण्यात आले. मात्र कवठेमंकाळ जवळच पोहोचताच त्याचा मृत्यू झाल्याने परत त्या स रुग्णवाहिकेने जत येथे आणण्यात आले.
जखमींना भाजप युवा नेते संजय तेली यांच्या मोफत रुग्णवाहिका द्वारे जत येथील ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. पण ईराप्पाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत भीमराव मायाप्पा पडवळे यांचे प्रेत जत ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर या अपघाताचा उमदी पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.