प्रतिष्ठा न्यूज

ट्रक चोरी करणारा व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या २ इसमांस अटक ; सात लाख रुपये किंमतीचे ट्रक जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ट्रक चोरी करणाऱ्या व चोरीचा बनाव रचण्यास मदत करणाऱ्या २ इसमांस अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७,१०,०००/- रु. किंमतीचे २ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सदरची कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी १) बिरदेव बाळु गडदे, वय २६ वर्षे, रा. गाँडवाडी, गडदेवस्ती, सांगोला, ता. सांगोला, जि. सांगली. २) गणेश अनिल भोसले, वय ३२ वर्षे, रा. रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली.

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काबुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि.१९/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोहेकों / संकेत मगदुम, पोहेकौं / अमोल ऐदाळे, पोना / सोमनाथ गुंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिरज शहर पोलीस ठाणेस ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयातील चोरीस गेला ट्रक हा विश्रामबाग ट्रक अड्यावर लावलेला असून सदर चोरीचा चोरी करणारा बिरदेव गडदे आणि बनावास मदत करणारा गणेश भोसले हे थांबलेले आहेत. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विश्रामबाग ट्रक अड्डा परिसरात निगराणी करत असताना,

एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासलेले असून सदर ट्रकजवळ दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले.

त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर दोनही इसमांना

पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) बिरदेव बाळु

गडदे, वय २६ वर्षे, रा. गौंडवाडी, गडदेवस्ती, सांगोला, ता. सांगोला, जि. सांगली. २) गणेश अनिल भोसले,

वय ३२ वर्षे, रा. रमामातानगर, काळे प्लॉट, सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज

पवार यांनी त्यांना पंचांसमक्ष मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्यांचे जवळ लावले ट्रक बाबत आणि नंबर

प्लेटवर काळे लावलेबाचत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक

पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता, बिरदेव गडदे याने सांगितले की,

त्यास ट्रक घेणेस फायनान्स मिळाला नसल्यामुळे त्याने त्याचे चुलते यशवंत गडदे यांचे नावे फायनान्स करून टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा एमएच ५० ४८७५ हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरीत होता. सदर ट्रकच्या फायनान्सचे हप्ते थकीत झाल्याने तो व त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगनमत करून सदरचा एमएच ५० ४८७५ हा ट्रक मोहन शेंबडे रा. सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसले याचे मालकीचा टाटा १६१३ एम एच १० ड्रझेड ४५८४ या ट्रकला एमएच ५० ४८७५ नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपुर रोड, शेतकरी धाब्याजवळ काही काळ ट्रक लावून तेथून कोणलाही काही एक न सांगता तो पुन्हा स्वतः आणुन विश्रामबाग ट्रक अड्डयावर लावला. त्यानंतर त्याने चुलते यशवंत गडदे यांना त्यांचे नावे

असलेला ट्रक चोरी गेला असल्याचे खोटे सांगुन त्यांना तो वापरत असलेला एमएच ५० ४८७५ हा ट्रक चोरीस गेलेबाबत चुलते यशवंत गडदे यांना खोटी फिर्याद देणेस लावली असल्याची कबूली दिली. सदर बाबत मिरज शहर पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे ट्रक

चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच नंबरप्लेट बदलून लावलेला असल्याचा ट्रक पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला. गुन्हयात चोरीस गेला असल्याचे भासविल्याचा मुळ ट्रक हा पंचनाम्याने जप्त केला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोहेकों/संकेत मगदुम, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, अमोल लोहार, बाबासाहेब माने, अमर नरळे, पोना / सोमनाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, पोशि / सुनिल जाधव, रोहन गस्ते, अभिजीत ठाणेकर,
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे,
अजय बंदरे, चालक पोशि/ गणेश शिंदे, स्था. गु. अ. शाखा. पोकों/ कैप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.