प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टी येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टी येथे रवि रोहित काळे, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली याच्यावर सशस्त्र हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सांगली शाखेने जेरबंद केला आहे. रोहित रवी सकट, वय २४ वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली. असे संशयितांचे नाव आहे.
काळे, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी,
दि.०८/०१/२०२४ रोजी इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली येथे मयत इसम नामे रवि रोहित काळे यास दोन इसमांनी धारदार कोयता व चाकुने भोकसून जखमी केले होते तो वैद्यकिय उपचारादरम्यान मयत झाल्याने विश्रामबाग पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा दाखल आहे.

सदर दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीना अटक करणेबाबत आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील सपोफौ अनिल ऐनापुरे आणि पोशि / रोहन घस्ते यांना त्यांचे गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, रोहित रवी सकट, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली आणि त्याचा साथीदार हे १०० फुटी रोड ते उष:काल हॉस्पीटल रोडकडे जाणारे रोड कडेला झुडपात लपून बसलेले आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे १०० फुटी रोड ते उषःकाल हॉस्पीटल रोड कडेच्या आजुबाजूचे परीसरात निगराणी केली असता, दोन संशयीत इसम रोड कडेला झुडपात संशयास्पदरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून थांबलेले दिसले. मिळाले बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) रोहित रवी सकट, वय २४ वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी, सांगली व २) विधीसंघर्षित बालक अशी असलेची सांगितली. त्यांचेकडे रवि काळे याचे खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता, रोहित सकट याने व त्याचे सोबत असलेल्या विधीसंघर्षित बालक यांनी मिळुन रवि काळे याचेशी झालेल्या पुर्ववैमनस्यातुन सदरचा खुन केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीना पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.