प्रतिष्ठा न्यूज

गांजा विक्री करणारा सराईत आरोपी अटक ; १,७३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सांगली शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकुण १,७३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगली शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगीरी केली. संशयित आरोपीचे नाव अरिहंत राजगोंडा पाटील वय-३२ वर्षे, रा. जैन मंदीर जवळ कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर असे आहे.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मँडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे चोरी, घरफोडी व गंभीर गुन्हयाचे घटनास्थळी लागलीच भेट देवुन गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांना अटक करणेचे तसेच लोकसभा निवडणुका २०२४ चे अनुशंगाने पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलींग करुन अवैद्य धंद्यांवर कारवाई करणेचे आदेश देणेत आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे.

सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांना अटक करणेचे कसुन प्रयत्न करित आहेत.

दि-१८/०६/२०२४ रोजी यातील अटक आरोपीत हा सागंली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सागंलीवाडी टोलनाक्याजवळील शुभ मंगल कार्यालय जवळ सागंलीवाडी येथे गांजा विक्री करणेकरिता येणार असल्याची गोपणीय बातमीदारामार्फत मिळाले बातमीप्रमाणे जावुन वॉच केले असता तेथे एक इसम त्याचे ताब्यात एक पांढरे रंगाची कापडी पिशवी असल्याची दिसली. त्यावरुन मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमाचा संशय आलेने मिळाले बातमीची खात्री करणेकरीता त्याचे जवळ जावुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात एकुण ०४ किलो ३९८ ग्रॅम वजनाचा ८४,०००/- रुपये किमतीचा गांजा, व एक लाल काळे रंगाची बजाज कंपनीची पल्सर २२० एफ मॉडेल असलेली मोटरसायकल व २ वीवो कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १, ७३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

तरी सदर आरोपीत यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक / सागर गोडे सागंली शहर पोलीस ठाणे हे करित आहेत.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव साो. यांचे मार्गदर्शानाखाली मा.संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पो. ठाणे यांच्या आदेशानुसार १) पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार २) पोहेकाँ / १७६३ संदिप पाटील ३) पोहेकॉ/५३९ मच्छिंद्र बर्डे ४) पोहेकॉ/५४८ सचीन शिंदे ५) पोकॉ/१०३२ संतोष गळवे, ६) पोकॉ/७९३ गौतम कांबळे ७) पोकॉ/२४२४ संदीप कुंभार ८) पोकॉ / १६१४ सुमित सुर्यवंशी ९) पोकॉ / १६२५ पृथ्वीराज कोळी १०) पोकॉ/१०७० योगेश सटाले

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.