प्रतिष्ठा न्यूज

घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; २,२२,०००/- रु चा मुद्देमाल; एलसीबीची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करण्यात आला असून त्याच्याकडून २,२२,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेने ही कारवाई केली. जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव राहुल प्रकाश माने, वय ३० वर्षे, मुळ रा. उरुण, इस्लामपुर सध्या दत्तवसाहत, आष्टा, ता. वाळवा. असे आहे.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. २८/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस
निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपुर विभागात पेट्रोलिंग करीत असताना, पथकानील पोहेकों/ अरुण पाटील व पोशि / सुरज थोरात यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, राहुल माने हा चोरी करुन मिळालेला माल विक्री करीता मोटार सायकलवरुन पेठनाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, पेठनाका येथील हायवेच्या पुलाच्या परीसरात सापळा लावून थांबले असता, मोटार सायकलवरुन एक इसम संशयीतरित्या पुलाखाली येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव राहुल प्रकाश माने, वय ३० वर्षे, मुळ रा. उरुण, इस्लामपुर सध्या दत्तवसाहत, आष्टा, ता. वाळवा असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, पेंटचे उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी, गंठण व ७००० रु. रोख रक्कम मिळून आली व मोटार सायकलीस कापडी पिशवीत १५ साड्या मिळून आल्या. त्याचेकडे मिळालेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पैसे व साडयाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळुन आलेली सोन्याची अंगठी, गंठण, पैसे व साड्या हया त्यांने काही दिवसापुर्वी सुरूल गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबूली दिली.

सदर बाबत इस्लामपुर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले. राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर सांगली जिल्हयात वेगवेगळ्या पोलीस ठाणेमध्ये चोरी व घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपुर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास इस्लामपुर पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,

सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, पोशि/ सुरज थोरात, विनायक सुतार, रोहन घस्ते, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव स्था. गु. अ. शाखा, पोना / श्रीधर बागडी, पोशि / अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.