प्रतिष्ठा न्यूज

गर्भपात करुन महीलेच्या मृत्युस कारणीभुत ठरणारे सात संशयीत आरोपी ताब्यात; सांगली शहर पोलीस ठाणेचे सतर्कतेमुळे गुन्हा उघड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गर्भपात करुन महीलेच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याबद्दल संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगली शहर पोलीस ठाणेचे सतर्कतेमुळे गुन्हा उघड झाला आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक तेजस्वीनी रामचंद्र पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी, १) संजय गवळी रा. दुधगाव ता. मिरज, जि. सागंली
२) संगीता संजय गवळी रा. दुधगाव ता. मिरज, जि. सागंली
३) विजय संजय गवळी रा. दुधगाव ता. मिरज, जि. सागंली
४) डॉ. मारुती बाबासो खरात रा. कुपवाड
५) डॉ. कोठीवाले रा. रामानंदनगर ता. अथणी जि. बेळगाव राज्य-कर्नाटक
६) डॉ. कविता बडनेवर रा. महालिंगपुर जि. बागलकोट, राज्य कर्नाटक
७) जयसिंगपुर मधील सोनोग्राफी करणारे डॉक्टर तसेच मयत सोनाली कदम हीचे गर्भलिंगनिदान व गर्भपात करणारे डॉक्टरांना सहकार्य करणारे लोक

*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मँडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर

गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देवून गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांना अटक करणेचे आदेश देणेत आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे.
सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांना अटक करणेचे कसुन प्रयत्न करित आहेत.
दि-२८/०५/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, चिकोडी कर्नाटक या ठिकाणी एका महीलेचा गर्भपातादरम्यान मृत्यु झाला असुन तेथील डॉक्टरांनी मयत महीलेच्या मरणाबाबत प्रमाणपत्र दिले नसल्याने तीचे नातेवाईक हे त्या महीलेस एका राखाडी रंगाच्या इर्टीगा कार नं- एम.एच.१२ एसएल ५२१५ या मधुन सागंली येथे घेवुन आले असुन सांगली मधील कोणी डॉक्टर सदर मयत महीलेच्या मरणाबाबतचे प्रमाणपत्र देतात काय याबाबतची चौकशी करित आहेत सध्ये ते सागंली शहरातील क्रांती हॉस्पीटल जवळील मोकळ्या मैदानात उभे आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सागंली शहर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/५३९ बर्डे, पोकॉ/१६१४ सुर्यवंशी, पोकॉ/७९३ कांबळे यांना घनास्थळी रवाना केले. सदर पोलीस स्टाफने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता त्यांना इर्टीगा कार नं- एम.एच.१२ एसएल ५२१५ मध्ये एक मयत महीला नामे सोनाली सचीन कदम वय ३२ वर्षे, रा. आळते ता हातकणंगले हीचे प्रेत व सोबत तीचा भाऊ विजय संजय गवळी रा. बुधगाव ता. मिरज जि. सागंली व डॉ. मारुती बाबासो खरात रा. कुपवाड हे मिळुन आले त्यानंतर पोलीसांनी सदर मयत महीलेस पुढील कार्यवाहीकरिता सिव्हील हॉस्पीटल सागंली येथे घेवुन गेले. सदर घटनेचे चौकशीमध्ये सदर महीलेचा मृत्यु हा महालिंगपुर जि. बागलकोट राज्य- कर्नाटक येथे गर्भपात करित असताना झाल्याचे निष्पन्न झाल्याने तीचे मृत्युस कारणीभूत असणारे डॉक्टर व सदर मयत महीलेचे नातेवाईक यांचेविरुद्ध सागंली शहर पोलीस ठाणे गु. र.नं-००/२०२४ भा.द.वि.स कलम ३१२,३१३,३१४,३१५,३१६ गर्भधारणापुर्व प्रसवपूर्व रोग निदान तंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधि. कलम २३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा महालिंगपुर पोलीस ठाणे येथे पुढील तपासाकरिता वर्ग करणेत आलेला असुन संशयीत आरोपीत यांना महालिंगपुर पोलीस ठाणे रा. कर्नाटक यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*

मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब जाधव साो. यांचे मार्गदर्शानाखाली

मा.संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पो. ठाणे यांच्या आदेशानुसार १) पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार २) पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील ३) पोलीस उपनिरीक्षक केशव रणदीवे ४) पोहेकॉ / ५३९ मच्छिद्र बर्डे ५) पोना/२६०९ अमर मुजावर ६) पोकॉ/७९३ गौतम कांबळे, ७) पोकॉ / २२४७ गणेश कांबळे ८) पोकॉ/ १६१४ सुमित सुर्यवंशी ९) पोकॉ/१०३२ संतोष गळवे, १०) पोकॉ/२४२४ संदीप कुंभार ११) पोकॉ/ १६२५ पृथ्वीराज कोळी १२) पोकॉ/१०७० योगेश सटाले १३) पोकॉ/१०७९ भालचंद्र चव्हाण

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.