बेवारस मयताचे ओळखीबाबत माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीस
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे मिळालेल्या बेवारस मयताचे ओळखीबाबत माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी, शिराळा पोलीस ठाणे येथे दि. २०/०५/२०२४ रोजी गु.र.नं १११/२०२४ भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील मयत अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह शिराळा बायपास रोडवरील सुरले वस्तीचे अलीकडे श्रीआलय हॉटेल जवळील पुलाखाली एका जांभळ्या रंगाच्या प्रवासी बँगमध्ये दि. २०/०५/२०२४ रोजी सकाळी ०९.२० वा.चे पुर्वी मिळुन आला.
१) सदर मयत इसमाचे अंगावर फिकट क्रिम रंगाचा मळकट टि शर्ट रक्ताने माखलेला असुन त्याचे कॉलरवर GJCO असे लेबल असुन टी शर्टचे छातीवर GJCO लिहीलेले असून त्याखाली १९९१ असा लोगो आहे.
२) सदर प्रेतास हिरव्या रंगाचे नायलॉनचे दोरीने गळयास व शरीरास बांधलेले होते
३) सदरचे प्रेत एका भगव्या, हिरव्या, पिवळया रंगाचे पट्टे असलेल्या मळकट ६ फुट उंची व ३.५ फुट रुंदी असलेल्या सतरंजीमध्ये गुंडाळलेले होते.
४) सदर प्रेत एका जांभळ्या रंगाच्या प्रवासी कापडी बॅगमध्ये त्यावर इंग्रजीमध्ये Goodluck असा बॅच असलेली तसेच आतील बाजुस पिवळ्या रंगाचे अस्तर असलेली, खालील एका बाजुस दोन चाके व दुस-या बाजुस हँडल व त्यावर प्रेस बटन असुन त्यावर RJ असा लोगो असा असलेली बॅग तिची लांबी ३० इंच असुन रुंदी १८ इंच असलेल्या बॅगमध्ये घालुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने फेकुन दिले आहे. त्याचे सोबत एक सतरंजी तसेच त्याने परीधान केलेला टि शर्ट व प्रवासी बॅग असे मिळुन आल्याने शिराळा पोलीस ठाणे गु.र. नं १११/२०२४ भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सदर मयत बेवारस मयत पुरुष इसमाची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकरीता शिराळा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत.
तरी सदर मयत अनोळखी बेवारस इसमाचे ओळखीबाबत कोणास काही एक माहिती मिळाल्यास १) शिराळा पोलीस ठाणे. ०२३४५ २७२१३३ २) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली ०२३३ २६७२८५० ३) नियत्रण कक्ष, सांगली ०२३३ २६७२१००, ०२३३ २६७१०५५ या नंबरवर दयावी. माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
सदर अनोळखी बेवारस इसमाबाबत माहिती देवून सदर मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाल्यास २५,०००/- रुपयाचे बक्षीस मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जाहीर केले आहे.