प्रतिष्ठा न्यूज

आंबा महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषि विभाग सांगली व कृषि पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत ‘सांगली आंबा महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज या आंबा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कृषि पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषी उपसंचालक श्री. पाटील व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
24 ते 26 मे 2024 या कालावधीत कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे हा आंबा महोत्सव होत आहे. या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.