प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमास भेट

प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. १० : संयोगीता पाटील केंब्रिज स्कूल, मिरजच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मिरज येथील पाठक ट्रस्ट संचालित वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी तेथील अध्यक्ष्यांनी विद्यार्थ्यांना वृद्धाश्रम व अनाथाश्रमाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी आजी – आजोबांसोबत संवाद साधून एकमेकांच्या भावनांची देवाण-घेवाण केली. वृद्धाश्रमाची माहिती घेऊन मुलांनी अभिप्रायही नोंदवला.


यावेळी केंब्रिज स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. श्रीदेवी कुल्लोळी, सहायक लुधिया सावनुर, व वर्ग शिक्षिका यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या पीढीसाठी आवश्यक बाबींची माहिती मुलांना मिळाली. शाळेकडून मुलांनी खाऊंचे वाटप केले. अशा प्रकारचे आगळेवेगळे उपक्रम शाळेकडून राबविले जातात. हे पाहून वृद्धाश्रमातील सर्व सदस्यांनी शिक्षकांचे व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व मुले मुली खूप भावूक झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.