प्रतिष्ठा न्यूज

गटशिक्षणाधिकार यांच्या कडील शिक्षक निलंबनाचे अधिकार काढा: नांदेड शिक्षक सेनेची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी- मा. मिनल करनवाल मॅडम यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या कडील शिक्षक निलंबनाचे अधिकार काढावे याचे निवेदन देण्यात आले.
तालूका पातळीवर मा.गटशिक्षणाधारी यांच्या कडून अधिकाराचा दुरउपयोग होत आसून आनेक शिक्षकांना यांच्या कडील अधिकारामुळे फटका बसला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सन 2015 मध्ये गटशिक्षणाधिकारी यांना जिल्हा परिषद शिक्षकांचे निलंबन करण्याचे अधिकार दिले होते त्या अधिकाराचा दुरपयोग होत आहे. तसेच जिल्ह्यात पदोन्नत मुख्याध्यापकांच्या मोठ्या प्रमाणात  रिक्त जागा आहेत. त्या प्राथमिक शिक्षकांतून त्वरीत समुपदेशन पद्धतीने भरण्यात याव्यात, तसेच केंद्रप्रमुख, विषय शिक्षक, यांच्याही रिक्त जागा तात्काळ भराव्यात, निवडश्रेणी यादी निकाली काढण्यात यावी आणि शिक्षक रमेश बनकर यांचे निलंबन रद्द करावे, जि.पी.एफ स्लीप अचूक आणि त्वरीत वितरण करण्यात यावे.
अशा विविध मागण्यांचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी- मा.मिनल करनवाल मॅडम यांना देण्यात येऊन शिक्षकांचे प्रश्न त्वरीत निकाली काढून न्याय देण्याची विनंती मागणी करण्यात आली आहे.
      ●शिक्षक सेनेच्या उपक्रमाचे कौतुक
तसेच यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री- मा. उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त “प्रेरणा दिन” “झाडे लावा – झाडे जगवा” या वृक्षारोपन पंधरवडा निमित्ताने दि.13 जुलै ते 27 जुलै 2023 या कालावधीत शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपणचा स्तुत्य उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविला असल्याची माहिती मा.करनवाल मॅडम यांना देण्यात आली असता त्यांनी वृक्षारोपण या स्तूत्य उपक्रमाचे मनभरून कौतूक केले.
यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- मा. विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा सचिव- रवि बंडेवार, जिल्हा सल्लागार- शिवाजी पाटील, बळीराम शिंदे सह शिक्षक सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.