प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात पोलिसांनी केली चार बैलांची सुटका

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२२ : काल रात्री एका टेम्पोमध्ये चार बैलांना दाटीवाटीने कोंबून भुईबावडा घाटातून गगनबावडा मार्गे कोल्हापूरला नेताना पोलिसांनी टेम्पो अडवून चार बैलांची सुटका केली.
पोलिसांनी टेम्पो चालक सलाउद्दीन रमजान लांजेकर वय वर्ष ३५ मुक्काम पोस्ट कोळपे, तालुका वैभववाडी,जिल्हा सिंधुदुर्ग यास गगनबावडा येथील एसटी स्टँड समोरील चौकात,गगनगड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानी लगत टेम्पो अडवून शुक्रवारी रात्री चार बैलांची सुटका केली. व जनावरांच्या संरक्षणासाठी त्यांना आसळज येथील गोशाळेमध्ये ठेवण्यात आले आहे.
चार बैलांची किंमत १६००० असून जप्त केलेल्या टेम्पो महिंद्रा सुप्रो मॅक्सि व्ही एक्स हौदा टेम्पो नंबर एम एच झिरो नाईन एफ एल ६७५६, काळा रंगाची ताडपत्री बांधलेला अंदाजे चार लाख किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील व संजय पवार, पोलीस नाईक चंद्रशेखर बाटुंगे यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंधक कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.