प्रतिष्ठा न्यूज

आयुक्त सुनील पवार यांच्याकडून सांगली महापालिकेचा 807.81 कोटीचा कोणताही दरवाढ अथवा करवाढ नसणारा अर्थसंकल्प स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांना सादर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन 2023 : 2024 चा संभाव्य अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांनी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला. 807.81 कोटींचा कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसणारा हा अर्थसंकल्प आज आयुक्त सुनील पवार यांनी स्थायी समितीकडे सादर केला आहे. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके, मुख्य लेखाधिकारी सुशीलकुमार केबळे आणि अधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी आयुक्तांच्या प्रशासकीय अर्थसंकल्पाबाबत स्थायी सदस्य संतोष पाटील आणि स्वातीताई शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना आयुक्त सुनील पवार आणि प्रशासनाच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
यावेळी बोलताना आयुक्त सुनील पवार म्हणाले की, मागील तीन वर्षाचे उत्पन्न लक्षात घेऊन हा अर्थ संकल्प तयार केला आहे. यामध्ये मागील वर्षाची 63 कोटी शिल्लक आहे. यंदा जीपीएसद्वारे मालमत्ता शोधून उत्पन्न वाढ करण्यात येत आहे. यामधून 353 कोटींचे उत्पन्न येईल असे आयुक्त पवार म्हणाले. मागील शिल्लक 63.73 कोटी,
महसुली जमा 353 कोटी, डेडहेड 49.65,
यामुळे महापालिकेला भांडवली शिल्लक 137 कोटी, भांडवली जमा 203.35 कोटी असे एकूण 807.81 कोटींचा
अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यामध्ये महसुली खर्च 282.86 कोटी तर भांडवली खर्च 130.29 कोटी, डेड हेड्स 49 .65 कोटी, शासनाकडून अनुदानातून भांडवली खर्च 340.45 कोटी असा एकूण 807.26 कोटींचा खर्च असून 55 लाख रुपये संभाव्य शिल्लकीचे हे प्रशासनाचे अंदाजपत्रक आहे. प्रशासनाने तयार केलेल्या अंदाज पत्रकात कोणतीही दरवाढ किंवा करवाढ करण्यात आलेली नाही. ज्या महत्वाच्या योजना आहेत. त्यातही सर्वकामे या वर्षी पूर्णत्वास आणल्या जातील. नागरिकांच्या पायाभूत सुविधा डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थ संकल्प बनवण्यात आल्याचेही आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.