प्रतिष्ठा न्यूज

वसंतदादा बँकेचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या घरासमोर वाजवणार ढोल : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब, होतकरू, कष्टकरी,कामगार, शेतकरी, व्यापारी ,उद्योजक.शेतमजूर, पुरुष, महिला व शिक्षण घेत असलेले युवक, युवती, उद्योजक निर्मिती करणारे युवक, तसेच लहान मोठे लघु उद्योजक, तसेच सांगली शहरातील व जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम देणारी वअनेकांचे संसार फुलवणारी राज्यात परराज्यात व जिल्ह्यात सांगलीचे नाव मोठं करणारी एकेकाळी महाराष्ट्रातील व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी वसंतदादा शेतकरी सहकारी बँक या बँकेतून अनेक उद्योजकांनी घेतलेले करोडो रुपयांची कर्ज परत फेड न केल्यामुळे बँक अडचणीत आली गेली. त्यामुळे बँकेवर अववसायकची नेमणूक करण्यात आली. बँकेला बुडवायला निघालेले अनेक करोड रुपये कर्ज न भरणारे वसंतदादा बँकेकडून 68 कर्जदाराने घेतलेली रक्कम रुपये 195 कोटी आहे. सांगली जनते साठीआधारवड असलेली वसंत दादा सहकारी बँक सर्वसामान्यांचा विकास व्हावा या हेतूने स्व. मा विष्णू (अण्णा) पाटील स्व. मा.प्रकाश(बापू) पाटील स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व सामान्यची आर्थिक प्रगती सुधारावी या एकमेव उद्देशाने बँकेचे गौडधोड सुरू केले होते परंतु स्व.मदन (भाऊ)पाटील यांच्या निधनानंतर अनेक बड्या कर्जदाराने बँकेला चुना लावण्याची उद्देशाने कर्ज फेड परत केली नाही त्यामुळे बँक अडचणीत आली. अनेक कर्जदारने प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड न केल्यामुळे एकेकाळी प्रगतीपथावर असलेली बँकची सध्याचे परिस्थिती हालाखीची बनली आहे. सांगलीचं नाव महाराष्ट्रात मोठं करणाऱ्या वसंतदादा बँकेची सर्व कर्जे या मार्च अखेर भरून मदत करावी नाही भरल्यास प्रत्येक कर्जदाराच्या घरासमोर जाऊन शंखध्वनी व ढोल, ताशा, वाजवून घरासमोरच त्यांचा पंचनामा केला जाईल अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व दरारा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.