प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रपिता म. गांधीना सांगलीत काँग्रेसचे अभिवादन; म. गांधींच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी काँग्रेस कटीबध्द

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.३०:आज हुतात्मा दिनी राष्ट्रपिता म. गांधी यांच्या काँग्रेस भवनमधील प्रतिमेस व स्टेशनचौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाने बापूंची पुण्यतिथी साजरी करुन बापूजींना अभिवादन केले . यावेळी मा. अनिल मोहिते,बाबगोंडा पाटील व अशोकराव मालवणकर यांच्या हस्ते म. गांधी यांच्या प्रतिमेला व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील आणि जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत म. गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

अशोकराव मालवणकर म्हणाले, म. गांधी यांनी सत्य व अहिंसा या तत्त्वाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैचारिक चळवळ उभी करून स्वातंत्र्य रक्षणार्थ कायम कटीबध्द रहावे आणि येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करावे’.
अजित ढोले म्हणाले,’ राष्ट्रपिता म. गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये १९२० पासून काँग्रेसची धुरा सांभाळली. १८८५ मध्ये सर ॲलन ह्युम यांनी स्थापन केलेला काँग्रेस पक्ष हा रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा संस्थेच्या स्वरूपात मर्यादित होता. तो लोकमान्य टिळक यांनी शहरांमध्ये वाढवला व महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाची चळवळ खेडोपाडी नेली. १९३० सालात दांडी यात्रेच्या माध्यमातून व १९४२ मध्ये चले जाव ची घोषणा करून १९४७ ला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा थोर महात्म्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने व सेवा दलाच्या वतीने विनम्र अभिवादन. ‘
यावेळी स्वागत विठ्ठलराव काळे व आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले. यावेळी सौ. प्रतीक्षा काळे, शमशाद नायकवडी, बाबुराव माळी, सूर्यकांत लोंढे, अरुण पळसुले, कृष्णराव जगताप, शैलेंद्र पिराळे, सुरेश गायकवाड व काँग्रेस पक्षाचे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.