प्रतिष्ठा न्यूज

दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावांचा निश्चितपणे पाठपुरावा करू : ॲड. धन्यकुमार गुंडे ; दक्षिण भारत जैन सभा कार्यालयास सदिच्छा भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : देशाच्या जडणघडणीत जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सर्वांच्या कृपाशिर्वादामुळेच अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यां जाणून घेण्यासाठी माझी धार्मिक अल्पसंख्यांक समितीवर निवड झाली आहे. सभेने दिलेल्या प्रस्तावावर मी निश्चितपणे योग्य ती कार्यवाही करून जास्तीत जास्त निधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ॲड. धन्यकुमार गुंडे यांनी व्यक्त केले. सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ॲड.धन्यकुमार गुंडे यांनी दक्षिण भारत जैन सभेला सदिच्छा भेट देवून सभेच्या एकूण कार्याची व विविध शाखांच्या उपक्रमांविषयी माहिती घेतली. ते पुढे म्हणाले अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहामध्ये येवून त्यांचा विकास होण्यासाठी हा आयोग कार्यरत आहे.यावेळी ॲड. धन्यकुमार गुंडे यांना चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी सभेतर्फे विविध बांधकाम प्रस्तावांचे निवेदन दिले. बेळगाव येथील मुलींचे श्राविकाश्रम, स्तवनिधी येथील मुनि निवास व स्वाध्याय भवन, सांगली येथील श्राविकाम इमारत बांधकाम, वीर सेवा दल, जैन महिला परिषद, सभेच्यावतीने तीन एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती कार्यालय, जैन मंदिर, मुनि निवास, सांस्कृतिक भवनाचा प्रस्तावासंबंधी सविस्तर माहिती देवून सदर निधीसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली.स्वागत व प्रास्ताविक मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी केले. केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते ॲड.धन्यकुमार गुंडे यांचा तर त्यांच्या पत्नी सौ. निर्मला गुंडे यांचा महिला महामंत्री सौ. कमल मिणचे यांनी केला. आभार खजिनदार संजय शेटे यांनी मानले. यावेळी सर्वश्री शांतिनाथ नंदगावे, डॉ.सी.एन.चौगुले, प्रा.डी.ए.पाटील, तात्यासोा पाटील, बी.ए.मगदूम, प्रा. आर.बी.खोत, ए.ए.मासुले, सुरेश पाटील, डी.डी.मंडपे, महावीर खोत, प्रा.राहुल चौगुले, स्वरुपा पाटील-यड्रावकर, सुमंगला कारंजे, अनिता पाटील, छाया कुंभोजकर, मंगल चव्हाण, अनिता एस. पाटील, अंजली कोले, सुनिता चौगुले, विजया कर्वे, वीना आरवाडेसह विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.