प्रतिष्ठा न्यूज

तासगाव भाजपाच्या वतीने बसस्थानक चौकात जोडे मारो आंदोलन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मूळचे शेतकरी असलेले देशाचे महामहीम उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची मिमिक्री करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी व त्यावेळी शूटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या राहुल गांधी यांची प्रतिमा जाळून शंखध्वनीसह तासगाव भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.देशातील एक शेतकरी पुत्र कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना उपराष्ट्रपती पदा सारख्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतो, हेच मुळात काँग्रेसची विचाराच्या विरोधकांना सलत आहे,
मनामध्ये नेहमीच शेतकरी विरोधी नियत असणाऱ्या राहुल गांधी यांनी तर मिमिक्री करणाऱ्या खासदाराला जाब विचारण्याऐवजी त्याचे छायाचित्रण करण्यामध्ये धन्यता बाळगली,हेच संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे.
नुकत्याच दिल्ली येथील संसद भवनामध्ये काही देशविघातक आंदोलकांनी संसदेची सुरक्षा भंग करण्याचा प्रकार केला.या प्रकारानंतर संसदेमध्ये असंसदीय वर्तनामुळे निलंबित केलेले खासदार संसदेबाहेर एकत्र जमून एकमेकांसोबत हास्यविनोद करण्यात व्यस्त होते.
यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती श्री जगदीप धनकड यांच्या शारीरिक व्यंगावरून मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला.ही मिमिक्री करत असताना इतर विरोधक खासदार देखील महामहीम उपराष्ट्रपतींची टर उडवीत होते. यावेळी स्वतःला भावी पंतप्रधान समजणारे राहुल गांधी या सर्व घटनेचे छायाचित्रण करत होते ही बाब अत्यंत निषेधार्ह असून यामुळे देशाच्या लोकशाही तत्त्वांना यामुळे ठेच पोचली आहे,असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते संदीप गिडडे पाटील यांनी केले. तासगाव येथील बस स्थानक चौकात  बॅनर्जी यांची प्रतिमा जाळून व त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून हे निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.