प्रतिष्ठा न्यूज

20 पेक्षा कमी पटसंख्या, विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये म्हणून शिक्षणाधिकारी श्रीमती डॉ बिरगे यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज / जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.11 : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, नांदेड च्या वतीने 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा) श्रीमती डॉ सविता बिरगे यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामीण भागातील गाव,वाडी,तांडा,दुर्गम,डोंगराळ भागातील शाळा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली.
पदोन्नत मु.अ.,विषय शिक्षक,केंद्र प्रमुख यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे. 24 वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-यांना वरिष्ठ निवड श्रेणी देण्यात यावी. तसेच शिक्षकांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.महाराषट्र दर्शन रजा सवलत पूर्ववत चालू करण्यात यावी अशा विविध मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.
आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड च्या वतीने निवेदन शिक्षणाधिकारी डाॕ.सविता बिरगे मॕडम यांना देण्यात आले , या निवेदनाबाबत सन्माननीय राज्याध्यक्ष ज.मो.अभ्यंकर साहेब यांच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यात 20 पटापेक्षा कमी असणाऱ्या शाळा बंद करु नये असे निवेदन द्यावे व निवेदनाच्या भावना शासनास कळविण्यात यावे अशी मागणी केली. त्या शासनास पाठवण्यात येतील. तसेच नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यामध्ये माहे सप्टेंबर 2022 चा पगार लवकर करण्यात यावे. यावेळी मा.संचालक साहेब पुणे यांना बजेट पाठवणे बाबत मागणी मा.शिक्षणाधिकारी मॕडम यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून चर्चा केले लगेच कमी असलेले बजेट दोन ते तीन दिवसात येईल असे सांगितले व माहे आॕक्टोःबर चा पगार दिवाळी सणापुर्वी करावे , केंद्रप्रमुख पदे, पदोन्नत मुअ , विषय शिक्षक लवकरच भरणार , महाराष्ट्र दर्शन रजा सवलत बाबत लवकर आदेश काढणार असे आश्वासन शिक्षणाधिकारी डॉ बिरगे यांनी दिले. यावेळी शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर , तानाजी पवार , रवि बंडेवार , प्रा.परशुराम येसलवाड सर , गंगाधर कदम , शिवकुमार निलगीरवार , राजेश पवार , संजय मोरे , पुंडलीक कारामुंगे , बस्वराज मठवाले , देविदास जमदडे सर , वाडेकर सर शिक्षकसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.