प्रतिष्ठा न्यूज

दहशतवादाला खतपाणी घालणारे हलाल जिहादचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करावेत : मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर येथील हिंदूसंघटन मेळाव्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर – ‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल टुरिझम’पर्यंत हे वाढत चालले आहे. ‘हलाल’च्या माध्यमातून इस्लामी संघटना आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. हलाल जिहादच्या माध्यमातून जागतिक स्तरावर दहशतवादाला खतपाणी घालणारे षडयंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करायला हवेत, असे स्पष्ट प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 11 ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या माडीवर, राजारामपुरी या ठिकाणी पार पाडलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले की, मागील २० वर्षांमध्ये हिंदु जनजागृती समितीने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी व्यापक लढा दिला आहे. या लढ्याला मोठे यशही प्राप्त झाले आहे. व्यंग चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी रेखाटलेल्या देवतांच्या नग्न चित्रांना हिंदूंनी विरोध केल्यानंतर हुसेन यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झाले. त्यानंतर त्यांना कायमस्वरुपी कतार या देशामध्ये पळून जावे लागले, तसेच त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही रहित करण्यात आली. व्यावसायीक रंगभूमीवरील विडंबनात्मक १७ नाटके, तसेच ४ चित्रपट प्रदर्शित होण्यापासून समितीने रोखले. ‘अ‍ॅमेझॉन’ या आस्थापनावर देवतांविषयी विडंबनात्मक छायाचित्र ठेवल्याने समितीने केलेल्या विरोधामुळे आस्थापनाला हिंदूंची क्षमायाचना करण्यास भाग पाडले. या आणि अशा कित्येक आघातांवर समितीने वेळोवेळी आवाज उठवला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित या हिंदूसंघटन मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. आदित्य शास्त्री यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. मधुकर नाझरे सौ. राजश्री तिवारी, सौ. विजया वेसणेकर यांच्यासह धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी, तसेच विनामूल्य सुरु असलेल्या स्वरक्षा प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले, तसेच श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते कृतीशील धर्माभिमान्यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म यांविषयी फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.