प्रतिष्ठा न्यूज

बालकाला वाचवणाऱ्या राहुल कांबळेचा स्नेहजित प्रतिष्ठानतर्फे सांगलीत सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२४ : सांगलीतील गजानन कॉलनीत स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून बालकाला वाचवणाऱ्या राहुल कांबळे या धाडसी तरुणाचा कुपवाडच्या स्नेहजित प्रतिष्ठानच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
सांगलीत शुक्रवारी (दि.२१) झालेल्या मुसळधार पावसाने नैसर्गिक नाले ओव्हर फ्लो होऊन वाहत होते. शनिवारी (दि.२२) गजानन कॉलनीत ओव्हर फ्लो झालेल्या नाले परिसरात खेळणारा हसनीन मकानदार हा तीन वर्षीय बालक नाल्यात पडला. तो वाहून जात असताना त्याच्या आईच्या आक्रोशाने राहुलने प्रवाहात उडी घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जाणाऱ्या हसनीनला त्याने प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. या त्याच्या धाडसामुळे मकानदार कुटुंबाला त्यांचे मुल सुखरूप मिळाले. गवंडी काम करून उदर निर्वाह करणाऱ्या कांबळेचा आज स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी शाल, श्रीफळ, व रोख रक्कम देऊन सत्कार केला. राहुलच्या धाडसाने एक कुटुंब आनंदी राहिले, असे मत श्री. गौंडाजे यांनी व्यक्त केले. यावेळी स्नेहल गौंडाजे, विशाल व्होनमोरे, प्रशांत माने, अल्लाबक्ष सय्यद, मन्सूर मुल्लानी, हावलू मकानदार, विजापुरे, रमेश लवटे, भालचंद्र एडगे, अमीन मुल्ला, शब्बीर ऐनापुरे यांचेसह नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मकानदार कुटुंबाची भेट घेऊन हसनीनची विचारपूस केली. मकानदार कुटुंबाने स्नेहजित प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.