प्रतिष्ठा न्यूज

सुगाव केंद्राआंतर्ग येणाऱ्या परसरामतांडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा – वरिष्ठाचे दुर्लक्ष

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील सुगाव केंद्राआंतर्ग येणाऱ्या परसराम तांडा उमरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी दोघेही वरिष्ठांना कोणतीही सुचना न देता गैरहजर होते.
हा सर्व प्रकार आज दि 11 ऑक्टोबर 2022 रोजी घडला असल्याने या शिक्षकांवर कडक कार्यवाई करण्याची शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
परसराम तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक, कार्यरत असुन येथील विद्यार्थी पट संख्या 56 आहे. वर्ग 1ते 4 पर्यंत असलेल्या या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेसाठी हे शिक्षक सदा आपआपसात भांडणे करून नेहमी वेळेवर शाळेत येत नाहीत, उशिरा येतात त्यातच एक दिवस आड करून उपस्थित राहतात, विध्यार्थ्यांना शिकवीत नाहीत, मिळणारा भत्ता देत नाहीत, अशा अनेक तक्रारी तांडावाशीयांनी केंद्रप्रमुख व तालुका स्तरावर करून काहीही उपयोग झाला नाही. त्यातच आज दि 11 ऑक्टोबर रोजी मंगळवारी 11 वाजले तरी शाळेला कुलुप असल्याचा प्रकार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयपाल राठोड व ग्रामस्थांनी पाहिला व विध्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात बसुन गुरुजींची वाट पाहत अभ्यास करत असल्याचे दिसून आले. शेवटी दुपारचे 12 वाजले तरी गुरुजी आले नसल्याने शेवटी कंटाळून विद्यार्थी घरी परतले.
1) या सर्व प्रकरणा बाबत केंद्रप्रमुख बाबुराव कापसे यांचेशी संपर्क साधला असता मी 1 ऑक्टोबर पासुन दिर्घ रजेवर असल्याचे सांगितले.
2 ) तर गटशिक्षणाधिकारी लोहा मा.सोनटक्के यांच्याशी संपर्क केला असता या बाबतीत शाळा चौकशी साठी शिक्षण विस्तार अधिकारी फाटले यांना पाठविणार असल्याचे सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.