प्रतिष्ठा न्यूज

अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने आयोजित ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशन ला उस्फुर्त प्रतिसाद : मंजिरी गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने नेहमीच महिलांना सक्षम व सबलीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. विविध उपक्रम राबवून महिलांमध्ये आत्मविश्वास व उद्योजकता या गुणांच्या वाढीस चालना दिली जाते. दरवर्षी प्रमाणे महिलांना सर्वच क्षेत्रात आर्थिक दृष्टया सक्षम करण्याच्या उद्देश्याने अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने संस्थापिका मंजिरी गाडगीळ व स्मिता घेवारे यांनी शनिवार दिनांक २६ ऑगस्ट आणि रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी राजमती भवन येथे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशन ऑर्गनाइझ केले होते. या ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशनचे उद्घाटन शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सिनर्जी हॉस्पिटल चे डॉ. आरळी यांच्या हस्ते झाले. यावर्षी सहावे आणि नाविन्यपुर्ण प्रदर्शन शनिवारी-रविवारी राजमती भवन याठिकाणी पार पडले. या प्रदर्शनात नाविन्यपुर्ण वस्तू, कुर्तीज, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, हस्तकलेच्या कलाकृतीचे, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असे विविध ७० स्टॉल्स लावण्यात आले होते. स्टॉल्स पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिलांनी दिलेल्या प्रतिसादामुळे व खरेदीमुळे स्टॉल्सधारक हि उत्साही होते. २६ ऑगस्ट सायं ४ पासून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व लकी ड्रो कार्यक्रम आयोजित केला होता. हळदी कुंकू कार्यक्रमात सौ. प्रिया गडकरी यांच्या दैवज्ञ कस्तुरी मंगळागौर ग्रुपने अतिशय सुंदर मंगळागौर खेळ सादर केले. व यावेळी महिलांनी मंगळागौर फेर धरत व बाईपण भारी देवा म्हणत मोठ्या जल्लोषात कार्यक्रम साजरा केला. महिला वर्गाचा कार्यक्रमास प्रचंड उत्साह व प्रतिसाद मिळाला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एक ब्रेक हवाच यासाठी महिलांनी थोडा वेळ काढत या एक्झीबिशन ला जोरदार प्रतिसाद दिला व पुरेपूर आनंद घेतला. लोकांच्या प्रतिसाद मुळे स्टॉल्सधारक उत्साही होते
यावेळी संस्थापिका मंजिरी गाडगीळ, स्मिता घेवारे, रीटा शहा, ममता शहा, विद्या खिलारे, शर्वरी इनामदार, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, कल्पना कोळेकर, संगीताताई खोत आदी महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.