प्रतिष्ठा न्यूज

ठाकरे महाराष्ट्र च्या जनतेची माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन : ‘भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा इशारा; कंत्राटी भरतीचे पाप महविकास आघाडीचेच

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री ढंग यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे.

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन करून श्री ढंग म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असे म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसने केलेले पाप आहे.

उद्धव ठाकरेंसह मविआचे नेते केवळ बोल घेवडे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर रीत्या उघड केली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजपाचे कार्यकर्त तीव्र आंदोलन करतील. महाविकास आघाडीच्या बोल घेवडा नेत्यांना भाजपा धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही प्रकाश ढंग यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंदभाऊ देशपांडे, दिनकरतात्या पाटील, लोकसभा संयोजक दीपकबाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, मोहन वनखंडे, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, संघटक सरचिटणीस दीपक माने, माजी नगरसेवक स्वातीताई शिंदे, गीतांजली धोपे पाटील, राजेंद्र कुंभार, लक्ष्मण नवलाई, माजी महापौर, संगीता खोत, अप्सरा वायदंडे, सोनाली सागरे, अमर पडळकर, अविनाश मोहिते, दरीबा बंडगर, रवींद्र सदामते, शितल कर्वे, भोपाल सरगर, मोहन वाटवे, युवराज बावडेकर, रोहित जगदाळे, सुरज पवार, सुभाष गडदे, महेंद्र पाटील, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.