प्रतिष्ठा न्यूज

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत सागरेश्वर अभयारण्यात 22 मे (बुध्द पौर्णिमा) रोजी अभयारण्यातील 8 पाणस्थळावर प्राणीगणना कार्यक्रम घेण्यात आला. या प्राणीगणना कार्यक्रमात 14 वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह 8 प्रगणकांनी (स्वयंसेवक) सहभाग घेतला.
वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेच्या दिवशी सागरेश्वर अभयारण्यात (सांगली जिल्हा) प्राणीगणना कार्यक्रम घेतला जातो. प्राणीगणना कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमिंना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळत असल्याने दरवर्षी प्राणीगणना कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्याकरिता या दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.
वन्यजीव विभागामार्फत राबविण्यात आलेल्या प्राणी गणना कार्यक्रमात मुंगूस- 1, माकड- 71, रानडुक्कर-28, चितळ-171, ससा-4, सांबर-220, साळिंदर- 7, मोर- 11, कोल्हा- 5 आणि घोरपड- 5 या प्राण्यांचे प्राणीगणना प्रसंगी दर्शन झाल्याची माहिती कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.