प्रतिष्ठा न्यूज

एसटी कष्टकरी जनसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार नितीन शिंदे व जिल्हा सचिव म्हणून महेश शेळके यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : एस,टी कष्टकरी जनसंघाची सन 2024 ची विभागीय बैठक कालिका मंदिर हॉल ,सांगली बस स्टॅन्ड नजीक येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातून सर्व आगारातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
एस,टी कष्टकरी जनसंघाच्या सांगली विभागीय कार्यकारणीची निवड केंद्रीय उपाध्यक्ष तथा सांगली एस,टी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माननीय *श्री अजितदादा मगरे साहेब* यांच्या उपस्थितीत तसेच एस,टी कष्टकरी जनसंघाचे संस्थापक मा, डॉक्टर गुणरत्न सदावर्ते व अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर जयश्रीताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आल्या. त्यामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष मा,*श्री नितीन राजे शिंदे* यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी  पदाधिकाऱ्यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला .
तसेच विभागीय सचिव म्हणून माननीय *श्री महेश मुकुंद शेळके,* तर
विभागीय सल्लागार म्हणून माननीय *श्री डी,डी,पटेल साहेब* तसेच
विभागीय कार्याध्यक्ष म्हणून माननीय *श्री बाबासो गुरव,*
विभागीय प्रसिद्ध प्रमुख माननीय *श्री रमेश ढमाळ* यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या,
सांगली जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून  एस,टी कष्टकरी जनसंघ हा मान्यता प्राप्त केल्याशिवाय व मुजोर व त्रास देणाऱ्या प्रशासनाचे अधिकाऱ्यांच्या वर आंदोलने, जरूर पडेल त्या सर्व कारवाया करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे विभागीय अध्यक्ष म्हणून माननीय नितीन राजे शिंदे हे बोलत होते.
यावेळी एस,टी को-ऑपरेटिव्ह बँकेचे सांगली शाखेचे संचालक माननीय श्री अजित दादा मगरे यांनी बँकेसंदर्भातील नव्याने होत असलेल्या बदलाबद्दल व कामगारांना सोप्या पद्धतीने लवकरात लवकर कर्ज वाटप होईल तसेच मोठ्या प्रमाणात एस,टी बँकेत ठेवी ठेवण्यासाठी आव्हान करू या विषयावरही सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीमध्ये माजी विभागीय सचिव *श्री राजू खैरमोडे,* यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिवांना तसेच सर्व निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्ष सचिवांचा सत्कार एस,टी को-ऑप,बँक सांगली शाखेचे बँक मॅनेजर *श्री राहुल पुजारी* यांनी बँकेतील सर्व स्टाफ तर्फे पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला विभागीय उपाध्यक्ष श्री राजू फकीर, विभागीय सहसचिव श्री सुरेश देशमुख, श्री पितांबर मंडले, श्री अभिजीत शिंदे, श्री सतीश गायकवाड,श्री सुरेश माने, श्री मंगेश खवरे ,श्री अरुण पाटील, श्री  एन यु मोरे , श्री विनायक कोळी, श्री सुहास माळी, श्री शामराव पाटील,आदी कर्मचारी पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.