प्रतिष्ठा न्यूज

कंधार येथे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती,रूग्णांना फळे वाटप

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जूलै रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कंधार येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवेवरच्या गणपती मंदिर येथे अभिषेक करुन महाआरती करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे लोहा – कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजू टोम्पे, शिवसेनेचे कंधार तालुका संघटक पंडीतराव देवकांबळे, शहरप्रमुख अतुल पापीनवार, किसान सेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख व्यंकट मोरे, आत्माराम लाडेकर, सर्कलप्रमुख माधव लुंगारे, धोंडीबा बिंगेवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.