प्रतिष्ठा न्यूज

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित कावड यात्रा भक्तीमय व उत्साहात सपंन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्रावण सोमवार निमित्त सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शा ने पावन झालेल्या ११ गडकोटा वरील जल, तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरून पवित्र ११ नद्यांचे जल पुजन सांगली शिवतीर्थ येथे.
कालीपुत्र श्री कालीचरण महाराज, संस्थापक अध्यक्ष.मा नितीन दादा चौगुले, माजी आमदार.मा. दिनकर तात्या पाटील, भा.ज.पा चे नेते दिपक बाबा शिंदे, प्रसिद्धी उधोजक मा मनोहर सारडा (काकाजी),
अ. नु .जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री मोहनजी व्हनखंडे, युवा नेते सागर व्हनखंडे, नगरसेवक मा लक्ष्मण नवलाई,शिवसेना सांगली शहर अध्यक्ष मा. मयूर घोडके,उधोजक मा राहुल ढोपे-पाटील, सागर घोडके ( Nagarsevak) यांच्या सह प्रमुख पाहुणे च्या उपस्थिती पार पडला.
या वेळी काली पुत्र श्री कालीचरण महाराज यांच्या शिवतांडव व गोंधळाने अखंड शिवतीर्थ शिवमय झाले होते. याप्रसंगी कालीचरण महाराज म्हणाले,
सर्वांना काही ना काही हवे असते,धन, बलिष्ठता, समृद्धी, ऐश्वर्य. पण,
*नुसत्या मेहनतीने हे साध्य होत नाही. फक्त मेहनतीने हे साध्य झाले असते तर सर्वात जास्त सुखी मजूर झाले असते. पण असे होत नाही, मेहनतीच्या बरोबर ईश्वराची कृपा महत्त्वाची आहे व ती मिळवण्यासाठी सर्वांनी ईश्वराची साधना, अधिष्ठान केले पाहिजे.* पवित्र श्रावण महिना सुरू आहे. *श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत आयोजित कावड यात्रा भगवान शंभू महादेवाची साधना करण्याचा मोठा मार्ग आहे.* तसेच,
यावेळी बोलताना *कालीचरण महाराज म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात कावड यात्रा विशेषतः कुठे दिसत नाही. मात्र श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत सुरू झालेली कावड यात्रा हि खुप मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंका नाही.*
मा. मनोहरजी सारडा यांनी कावड यात्रा चे महत्व आपल्या अध्यात्मिक वाणीतुन कावड यात्रा ही कशी केली जाते व का करावी या बद्दल मार्गदर्शन केले.तसेच,
मा. दिपक बाबा यांनी स्वातंत्र्य अमृतमहोत्सव, संकष्टी चतुर्थी व श्रावण सोमवार अशा सुवर्ण योगायोग मध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ने कावड यात्रेचा जो उपक्रम सुरू केला आहे आणि तो उपक्रम शिवतीर्थ येथून सुरू  होतोय  याचा सारखा आनंद दुसरा असु शकत नाहीत.
पुढे बोलताना  ते म्हणाले कि,
*श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत सुरू केलेली सांगली ची कावड यात्रा ही या पुढील काळात सांगली मध्येच नाही तर पश्चिम महाराष्ट्र मध्ये एक आदर्श निर्माण करेल.*
या वेळी शिवभक्त, सांगलीकर व सांगली पंचक्रोशी मधून बंधू भगिनी तसेच सर्व युवा सहकारी उपस्थिती होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.