प्रतिष्ठा न्यूज

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी पदी बदली; तुर्तास नवीन जिल्हाधिकारी नाहीत

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि. 19 : नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची बदली करण्यात आली असून ते आता नागपूर येथे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई यांनी आज दि. 18 ऑगस्ट रोजी बदली चे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी म्हणून नांदेड येथे रूजू झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोना महामारी काळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील गाढा अभ्यास, अनुभव होता. कोरोना रूग्णांना व्हॅक्सिनेशन ,व्हेटीलेटर (ऑक्सीजन) उपलब्ध करून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेतक-यांची कर्जमाफी, कर्ज उपलब्ध करणे, पिक कर्ज, ओला दुष्काळ आदी समस्या सोडविल्या.
त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी कधीच, कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावास बळी पडले नाहीत.
कृषी क्षेत्र, फुल शेती साठी विशेष लक्ष दिले. खेड्या- खेड्यात जाऊन बांबू लागवडीसाठी जनजागृती केली. आधुनिक शेती चे महत्त्व पटवून दिले. प्रशासनात शिस्त निर्माण केली. धर्मा- धर्मात शांततेचे वातावरण निर्माण करून सण, उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रयत्न केले.
समूह राष्ट्रगीत गायन आणि स्वराज्य दिन तसेच स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले. नैसर्गिक आपत्ती काळात पूरग्रस्त भागात थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन भेट दिली. अलिकडे त्यांनी तृतीय पंथीय व्यक्ती ना सेतू सुविधा केंद्र देऊन स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत केली.
मात्र जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची अचानक बदली झाली असून तुर्तास नवीन जिल्हाधिकारी यांची नियुक्ती वेंटीगवर आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.