प्रतिष्ठा न्यूज

तासगांव संभाजी ब्रिगेडच्या वतीने घरोघरी सभासद नोंदणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव संभाजी ब्रिगेडच्या वतीने आजपासून जुने तहसील कार्यालय समोरील स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्मा स्तंभ स्मारकास पुष्प अर्पण करून येथूनच संभाजी ब्रिगेड घरोघरी मोहीम तालुकाध्यक्ष शिवश्री प्रशांत केदार यांनी सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ केला. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष प्रशांत केदार म्हणाले,संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज (दादा) आखरे यांचे आदेशाप्रमाणे व सांगलीचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनानुसार तासगाव तालुक्यात आजपासून सभाजी ब्रिगेड घरोघरी सभासद नोदणी मोहिमेला आज प्रारंभ करण्यात आला आहे.येत्या काळात संभाजी ब्रिगेडचे घरोघरी सभासद असतील. तालुक्यातील सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा निर्भिड राजकीय पक्ष म्हणून तासगांव संभाजी ब्रिगेडने वेगळी ओळख निर्माण केली आहे.तालुक्यातील जनतेसाठी संभाजी ब्रिगेड एक उगवता सक्षम राजकीय पर्यायी पक्ष  म्हणून उदयास येत आहे.संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढवण्यासाठी व युवकांच्या मागणीप्रमाणे सभासद नोदणी मोहीम सुरू करण्यात आल्याचे यावेळी शिवश्री केदार यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.