निधी अमित शंभवाणी हिची महाराष्ट्र राज्य मुलींच्या क्रिकेट संघात निवड
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या १५ वर्षाखालील मुलींच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीची खेळाडू कु. निधी अमित शंभवाणी हिची निवड झाली आहे.
सदरच्या स्पर्धा दि. २६ डिसेंबर २०२२ ते 3 जानेवारी २०२३ दरम्यान रांची येथे संपन्न होणार आहेत पुणे येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे तिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. तिला बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीचे NIS क्रिकेट प्रशिक्षक मा. आमसिध्द गुंडदळ यांचे प्रशिक्षण लाभले.
तसेच तिला सांगली जिल्हा क्रिकेट असो. चे अध्यक्ष, सँथोम इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीचे श्री. जयंत टिकेकर, श्री.रुपेश पारेख, श्री.संदिप पाटील, श्री. दिलीप सामंत, श्री. सुरज बल्लाळ व सर्व सदस्य सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले तसेच दि. २५/ १२ / २०२२ रोजी संघ रांची साठी रवाना झाली.