प्रतिष्ठा न्यूज

लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या वतीने कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या सत्काराचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू- मा. डॉ.उध्दव भोसले हे दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्ताने “लक्ष्यवेध फाऊंडेशन” नांदेडच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.6 नोव्हेंबर 2023 रोज सोमवारी सायंकाळी- 6 वाजता राजमुद्रा न्यूज चैनलचे सभागृह, डी.मार्ट रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी- माजी सहसचिव ग्रामविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य तथा लक्ष्यवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष- मा. एकनाथ उर्फ अनिल मोरे हे राहणार आहेत. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लक्ष्यवेधचे विश्वस्त शिवश्री- मा.कामाजी पवार, लक्ष्यवेधचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक- मा. डॉ. गोविंद नांदेडे, लक्ष्यवेधचे सचिव तथा सुप्रसिद्ध साहित्यिक- मा.डॉ. हनुमंत भोपाळे, कोषाध्यक्ष तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी- मा. शिवाजीराव कपाळे, राजमुद्रा न्यूज चॅनलचे संपादक तथा सहसचिव- मा. संगमेश्वर लांडगे, कार्यकारिणी सदस्य तथा सुप्रसिद्ध वक्ते इंजि.-मा. शिवाजीराजे पाटील, कार्यकारणी सदस्य तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक- मा. शिवा कांबळे, विश्वस्त तथा कवी-मा. जगन शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे लक्ष्यवेधच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सचिव- डॉ.हनुमंत भोपाळे यांनी कळविले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.