प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका मुख्य कायदे सल्लागार ॲड. सुशिल मेहता यांची पदावरून उचलबांगडी करा : जिल्हा संघर्ष समितीची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. १९: सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मुख्य कायदे सल्लागार अॅड. सुशिलकुमार सुमतीलाल मेहता यांनी केलेल्या व्यवसायिक गैरवर्तनाबाबत तक्रार क्र. १७८/२०१९ बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा या वकील व्यवसायाचे सनियंत्रण करणार्‍या वैधानिक संस्थेकडे दाखल झाली आहे. सदर तक्रार सन २०१९ साली दाखल झाली होती ती ॲड मेहता यांना ज्ञात होती. त्यांनी आपल्या विरुध्द तक्रार दाखल झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून देणे नैतिकदृष्टया आवश्यक होते. तसेच नैतिकतेच्या भुमिका ठेवून आपणहून पदावरून दुर होणे आवश्यक होते. तसे न करता ते त्या पदावर चिकटून बसले आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक जबाबदार्‍यांचे गंभीरपणे उल्लंघन केले असून, त्यांच्या कृत्यांमुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्नचिह उभे राहिले आहे. ज्यामुळे महापालिकेच्या पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच ही अतिशय गंभीर बाब महापालिकेपासून का लपवून ठेवली? याबाबतची चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.

ॲड. मेहता यांनी हेतुपुरस्सर, मुद्दाम आणि स्वत:च्या अर्थिक लाभाकरीता दिलेले बरेच कायदे सल्ले हे वादग्रस्त असल्याबाबत नागरीकांमध्ये चर्चा आहे. त्यांनी आजपर्यत दिलेल्या सर्व कायदे सल्ले पुन्हा तज्ञ आणि त्रयस्त वकीलांच्या समितीमार्फत तपासावेत : श्री. तानाजी रुईकर यांनी केले आहे.

आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेउुन ॲड. सुशिलकुमार सुमतीलाल मेहता यांना त्वरीत विनाविलंब महापालिकेच्या मुख्य कायदे सल्लागार पदावरुन हटवावे. महापालिकेच्या वतीने चालवत असणार्‍या सर्व न्यायालयीन खटल्यामधील त्यांचे वकीलपत्र रद्द करावे. ॲड मेहता यांनी महापालिकेची विश्वासघात करून फसवणूक केली असल्याने, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास तमाम सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना ही अतिशय गंभीर बाब जाहीरपणे समजावी म्हणून आयुक्त कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.

निवेदनावर श्री. तानाजी रुईकर, श्री. असिफ मुजावर , श्री. राजु ऐवळे श्री. सागर शिंदे, श्री. बबलू मुजावर, श्री. सुनिल गिड्डे, श्री. भालचंद्र निकम श्री. जोतीराम माळी, श्री. गोरख वनखंडे यांच्या सह्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.