प्रतिष्ठा न्यूज

नवरात्रीत अंबाबाईचें दर्शन होणे भाग्याची गोष्ट : सौ ज्योतीताई संजयकाका पाटील…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निमणी ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंदा नवरात्री निमित्त महिलांना नवदुर्गा दर्शनाची मोफत सोय करण्यात आली.
यावेळी वैजयंता फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई पाटील यांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा.
निमणी येथील निराधार व कष्टकरी महिलांना नवरात्रीच्या काळात नवदुर्गा दर्शन व्हावे याकरिता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी हा उपक्रम राबविला.सौ ज्योतीताई पाटील व  निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील यांनी बसचे पुजन केले.
माजी सरपंच विजय पाटील यांनी स्वागत केले.यावेळी बोलताना सौ ज्योतीताई म्हणाल्या नवरात्रीचा उत्सव महिला मोठ्या भक्ती भावाने साजरा करीत असतात,या काळात आई अंबाबाईचे दर्शन होणे ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे गावातील कार्यकर्त्यांनी महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे.
के.पी.ट्रेडर्सचे मालक किरण आडके व संजय श्रीधर जोशी यांनी सर्व महिलांच्या फराळाची व्यवस्था केली.
यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके, माजी उपसरपंच आर डी पाटील , माजी पंचायत समिती सदस्य श्रीरंग देवकुळे,ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे,सौ शुभांगी सपकाळ,सौ संगीता चौगुले,आप्पासाहेब पाटील, सुरेशआण्णा पाटील,खंडू चौगुले, स्वप्निल चौगुले,विलास कदम,सतीश पाटील,किशोर घोडके,कृष्णा भोसले, तानाजी भोसले,सुरज पाटील,विनय सपकाळ,संजय देवकुळे,मोहन पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.