प्रतिष्ठा न्यूज

लम्पि चर्मरोग प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जनावरांचे बाजार व वाहतूक बंद : जिल्हाधिकारी- अभिजित राऊत

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार राज्यामध्ये उद्भवलेल्या गोवर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोग (Lumpy Skin Disease) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे बाजार व वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी-मा.अभिजित राऊत यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातअसलेल्या एकूण 16 तालुक्यातील 197 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पशुधन लम्पि चर्मरोग (Lumpy Skin Disease) या सांसर्गिक रोगाने जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे आढळून येत आसल्याने तसेच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी नांदेड जिल्ह्यात नजीकच्या आंतरराज्य सीमेवरील राज्यामधून होणाऱ्या वाहतुकीमुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता मा.अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्रीसाठीचे बाजार व वाहतूक पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लंपी चर्मरोग (Lumpy Skin Disease) या सांसर्गिक रोगाची लागण म्हैसवर्ग, शेळी व मेंढ्यामध्ये होत नसल्याने त्यांचे खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहतील असेही आवाहन जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांनी नमूद केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.