प्रतिष्ठा न्यूज

दोन महिन्यात सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय शंभर टक्के बंद करणार : पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे; जिल्हा पोलीस दलास प्राप्त बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दोन महिन्यात सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे शंभर टक्के बंद केले जातील. असा विश्वास कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला. आज पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडुन सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त ६६ दुचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे प्रमख अतिथी नामदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ना. सुरेशभाऊ खाडे म्हणाले, लोकार्पण करण्यात आलेली दुचाकी वाहने पोलिसांना सोईची आहेत. जिथं चारचाकी गाडी लवकर पोहचू शकत नाही तिथं पोलिसांना दुचाकीवरून तातडीने जाता येईल. सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे कमी झाले आहेत. ते येत्या दोन महिन्यांत पूर्ण बंद केले जातील. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढते. ती रोखण्यासाठी अवैध धंदे शंभर टक्के बंद केले जातील. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दोन महिन्यात गुन्हे रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना कामी आल्या आहेत.
यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी प्रास्ताविक केले. पोलीस उप अधीक्षक शहर विभाग आण्णासाहेब जाधव यांनी आभार मानले.
पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून सांगली जिल्हा पोलीस दलास ६६ दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. नमूद दुचाकी वाहनांना सायरन, पी.ए. सिस्टीम व सिक्वेशियल लाईट बसविण्यात आले आहेत. जनतेला तात्काळ मदत मिळावी. त्यांच्याशी सुसंवाद साधला जावा या करता Smart Beat System ही यंत्रणा सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्र व प्रमुख तालुक्याचे ठिकाणी एकुण ४० बीट मार्शल कार्यान्वीत करण्यात आले आहेत. एकुण ३५ बीट मार्शल, ४ ट्रॉफिक मार्शल व १ महिला बीट मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. सदर बीट मार्शल २ शिप्ट मध्ये २४ तास कर्तव्य करणार आहेत. बीट मार्शलचे कामकाज प्रभावी होणेकरीता प्रत्येक अंमलदाराकडे एक मोबाईल दिलेला आहे. हा मोबाईल नंबर बीट मधील जनतेकरीता देण्यात येणार आहे. नेमून दिलेल्या विभागामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अथवा घडु नये या करीता तात्काळ बीट मार्शलकडे देण्यात आलेल्या संपर्क नंबरवर संपर्क साधण्या करीता सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर बीट मार्शल मार्फत दिवसा व रात्री २४ तास पेट्रोलिंग करणे, पाहिजे फरारी आरोपी रेकॉर्ड आरोपी व संशयीत व्यक्ती यांचेवर लक्ष ठेवणे, शाळा/कालेज / उद्याने / बस स्टॅन्ड / धार्मिक स्थळे/गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी भेटी देणे, वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे व नागरीकाकडून प्राप्त होणाऱ्या कॉलला प्रतिसाद देऊन त्यांचे तक्रारीचा तात्काळ निपटारा करणेचे महत्वाचे कर्तव्य बीट मार्शल मार्फत करण्यात येणार आहे.
सदर वेळी ६६ बीट मार्शल व पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व नागरीक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.