प्रतिष्ठा न्यूज

महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा द्या – शरदचंद्रजी पवार

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा व तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ” महिलांच्या घराघरात जाऊन अडचणी समजून घ्या. त्यांच्यावरील अन्याय विरुद्ध संघटितपणे लढा द्या. ” माझा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे.
या सदिच्छा भेटीमध्ये चालू घडामोडी वर ही चर्चा झाली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी जिल्हा ग्रामीण अध्यक्षा अश्विनीताई माने, उपाध्यक्षा नीता पाटील, युती जिल्हाध्यक्षा सायली महाडिक, सरचिटणीस रेखा देवाळे, प्रदेश सरचिटणीस अर्चना तेंडुलकर, गगनबावडा महिला अध्यक्ष सुचित्रा पडवळ, शिरोळच्या स्नेहा देसाई व कागलच्या अश्विनी व्हरांबळे हजर होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.