प्रतिष्ठा न्यूज

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 15 : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत नदी स्वच्छ व अमृत वाहिनी बनविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, दूरदृष्यप्रणालीव्दारे उपवनसंरक्षक निता कट्टे, जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुघ, जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील यांच्यासह तिळगंगा, येरळा, अग्रणी, महांकाली, माणगंगा व कोरडा नदी समन्वयक तसेच चला जाणुया नदीला अभियानाचे कार्यकारी अभियंता तथा केंद्रस्थ अधिकारी उपस्थित होते.

नदीला जाणून घेवून तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी नदीचा ड्रोन सर्व्हे व इतर आवश्यक कामासाठी उपलब्ध निधीचा वापर विहीत पध्दतीचा अवलंब करून करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.

यावेळी नदी समन्वयकांनी त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. डॉ. मनोज पाटील यांनी सविस्तर सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. जलबिरादरी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुघ जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा यांनीही मौलिक सूचना मांडल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.