प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील ह्यांच्या प्रयत्नामुळे सांगलीहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे गाडी चालू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील ह्यांच्या प्रयत्नामुळे सांगलीहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे गाडी चालू झाली आहे.

– *गाडी नंबर-12493/12494- दर्शन एक्स्प्रेस* ही मिरज ते हजरत निजामुद्दीन नवीन रेल्वे सुरू झाली आहे. गाडी क्र. 12493 मिरज हून दर रविवारी पहाटे 4.50 वा. सुटेल. ही गाडी व्हाया पुणे , कल्याण, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा मार्गे निजामुद्दीन ला स. 06.45 वा. पोहोचेल.
परतीसाठी गाडी क्र. 12494 दर शुक्रवारी रात्री 21.40 वा. हजरत निजामुद्दीन हून सुटेल व मिरज येथे शनिवारी रात्री 01.00 वा. पोहोचेल. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. ही गाडी यापूर्वी पुणे येथून सुटत होती, त्याचा विस्तार मिरज पर्यंत व्हावा, यासाठी मा. खासदार संजय काका पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे पुणे येथून सुटणाऱ्या आणखी काही गाड्यांचा विस्तार मिरज पर्यंत करणेबाबत मिरज रेल्वे कृती समिती खासदार संजय काका पाटील यांचेमार्फत पाठपुरावा करीत आहे.
तरी सांगली जिल्ह्यातील सर्व प्रवाशांनी या नवीन गाडीचा लाभ घ्यावा . असे आवाहन सांगली लोकसभा खासदार श्री संजय काका पाटील यांच्या वतीने करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.