प्रतिष्ठा न्यूज

नांदेड कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीवर पुन्हा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे वर्चस्व सिद्ध- महाविकास आघाडीचे 17 उमेदवार विजयी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवत 17 उमेदवार विजयी झाले असून हमाल मापाडी मतदारसंघातून 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ही निवडणुकीत प्रतिष्ठेची केली होती. अखेर या बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.
दि.30 एप्रिल 2023 रोज रविवारी सकाळी 8 वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सभागृहात एकूण 12 टेबलवर मतमोजणी पूर्ण झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 उमेदवार यापूर्वीच निवडून आलेला आहे. बाकी 16 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 15 महाविकास आघाडीचे तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकही जागा मिळविता आली नाही.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 43 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. कृऊबा समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनलच्या 17 जागावर विजय मिळविता आला आहे. तर या कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये परिवर्तन करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली युतीचे परिवर्तन पॅनला एकही जागा जिंकता आली नाही. ही निवडणूक एकतर्फी होऊन महाविकास आघाडीचे 17 उमेदवार निवडून आले आहेत.
महाविकास आघाडी पॅनल विजयी करण्यासाठी माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बबनराव बारसे, माधवराव पावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, डॉ. सुनील कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेत महाविकास आघाडीचे 17 उमेदवार निवडून आणले.
विजयी उमेदवार- माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, संजय देशमुख लहानकर, श्यामराव पाटील टेकाळे, भगवानराव पाटील आलेगावकर, भुजंग पाटील डक, पत्रकार निळकंठराव मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गांधीजी पवार, निलेश देशमुख, नागोराव पाटील आढाव, सत्यजित भोसले, सदाशिव देशमुख, गायत्रीताई कदम, कमलताई वाघ, गंगाधर शिंदे, नाना पोहरे लिंबगावकर हे निवडून आले तर हमाल मापाडी मतदारसंघातून शिवाजी दराडे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे हे पूर्वीच बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयी झाल्याचे घोषित होताच कार्यकर्तांनी मोठा जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन आनंद साजरा केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.