प्रतिष्ठा न्यूज

तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील विजय रंगनाथ बाविस्कर राखीव पोलीस निरीक्षक आणि सुधीर हनुमंत लोंढे पोलीस हवालदार यांनी पोलीस दलात राहून उत्कृष्ट व खडतर सेवा बजावल्याने त्यांच्या उल्लेखनीय सेवेकरिता महाराष्ट्र राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक यांचे ‘सन्मान चिन्ह’ व प्रशस्तीपत्र पोलीस अधीक्षक श्री.धीरज पाटील यांचे आज हस्ते प्रदान करण्यात आले.विविध ठिकाणी कामं करत असताना उत्कृष्ट कामं करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज 1 मे महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून कर्तव्यदक्षपने कामं करणाऱ्या दोघांनाही राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक यांचे *सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र* पोलीस अधीक्षक श्री.धीरज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.याबद्दल पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे मा.प्राचार्य श्री.धीरज पाटील व श्रीकृष्ण हारुगडे,उपप्राचार्य मा. सूजय घाडगे उपप्राचार्य यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले,व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.