प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मोत्सव साजरा

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा व परिसरातील अनेक गावांत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांची 366 वी जयंती जन्मोत्सव म्हणून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी उमरा गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सुरेश पाटील सिरसाट यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पवन पाटील सिरसाट, सुरेश पाटील सिरसाट, ज्ञानेश्वर गायकवाड, मारोती वडजे, मनोहर तुंबरफळे, हणमंत ढगे, तिरुपती गायकवाड, परमेश्वर कौशल्य यांच्या सह अनेक युवा तरुणांनी छत्रपती संभाजीराजे महाराजांना अभिवादन केले. तसेच परिसरातील जोमेगाव, धनंज, कापशी, मारतळा, गोळेगाव, येळी, हातनी, वाका, पिंपळदरी, हिंदोळा आदी गावातही छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मोसत्व साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.