प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्राचे हक्काचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या सरकार विरोधात युवक राष्ट्रवादीचे तासगावात आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तासगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार सुमन पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून मार्केट यार्ड परिसरात आंदोलन करण्यात आले.
तालुका युवक अध्यक्ष दत्तात्रय हावळे यावेळी बोलताना म्हणाले दिल्लीकरांना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काचे उद्योग गुजरातच्या घशात घालत आहे. आपण ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो त्याच राज्यातील युवकांच्या माती बेरोजगारीचा शिक्का मारण्याचे पाप हे सरकार करीत आहे. टाटा एअर बस हा आपल्या राज्याचा हक्काचा उद्योग गुजरातला दिला. याआधीही महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातलाच कसे काय जातात. यामागे केंद्र सरकार आहे, हे सर्व युवकांना समजत आहे, म्हणूनच सरकार बरोबर केंद्राचा ही युवक राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आगामी येणाऱ्या निवडणुकीत युवक नक्कीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
सदर निषेधबाबतचे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी दत्तात्रय हावळे, दीपक उनउने, संदीप पाटील, अरविंद पाटील, संताजी पाटील, सुशांत पाटील, सचिन पाटील, महेश झांबरे,अभिनंदन कोंगनोळे, संकेत माने, सयाजी पाटील, विक्रमसिंह पाटील, दिनेश कुमार पाटील, उमेश मोहिते, अविनाश हंकारे, चंद्रकांत लोंढे, विठ्ठल पाटील रवींद्र फरतडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.